प्रेम हे

” भावनांचा ओघातून जे नात जुळून आल आहे ते नात प्रेमाच”, आणि हेच प्रेमाचं नात “तूझ आणि माझ” जे समाजाच्या नजरेने अयोग्य आहे. हे मला पण माहीत आहे आणि तुलाही की, जे आपण करतोय ते फक्त तुझ्यासाठी आणि माझ्यासाठीच योग्य आहे बाकी सर्वांसाठी अयोग्य………

प्रेम


 तरी सुध्दा आपण हे करत आहोत याच नेमकं कारण तरी काय…? याच उत्तर शोधायचा विचार केला असता, मला माझ्याच कडूनच उत्तर मिळालं की,…  हृदय, मन, दिल, असे ज्याचे नाव आहे त्याला हे सर्व करणे योग्य वाटते. भावना, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, समजदारी, काळजी, या गोष्टी जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा प्रेमळ आणि निर्मल प्रेमाची संकल्पना तयार होते. आणि आपलं हृदय आनंदाने बहरून जात, त्याला कुठे तरी  प्रेमाच्या सहवासाची गरज असते ,जे त्याला नेहमी हवेहवेसे वाटते. ह्या हृदयाच्या भावना कुणी तरी समजून घेणार पाहिजे असत. आणि  “तोच मला मिळाला”, सहज त्याचे आणि माझे मनाचे नाते, विचार, भावना जुळून येणारे असा.. “तो मिळाला”
     विचारही केला नव्हता मी तुझ्या प्रेमात पडेल. तुला पाहून फक्त कमेंट्स पास करणं आणि मनाने खुश होणं हेच मी नेहमी करायचे. करण मला माहित होतं तुझं आणि माझं कधी जुळणार नाही म्हणून…. नंतर माहीत पडलं तू आता लग्नाच्या बंधनात अडकणार आहेस, थोडा त्रास झाला आणि तुझ्या बद्दल असलेलं आकर्षण पण कमी झालं. पण हृदयाच्या एक कोपऱ्यात तुझ्या बद्दल असलेल्या भावना लपून बसला होत्या, काही दिवसांनी तू  परत माझ्या आयुष्यात आला आणि मी परत तुझ्या प्रेमात पडले. आणि तुही इतका जवळ आला की, मला माझ्या भावना व्यक्त केल्या शिवाय राहवलं गेलं नाही.
      आज मी तुझ्या इतक्या जवळ आले आहे की, दूर जाण्याची माझी हिम्मत होत नाही. पण तू आता कुणाचा तरी झाला आहेस. आणि तुला फक्त तिचाच बनून रहायचं आहे. याच्या शिवाय दुसरा पर्याय नाही… करण आपलं नात प्रेमाच जरी असल तरी त्याला समाज मान्य करीत नाही. मी जरी माझ्या भावना तुझ्या जवळ प्रकट केल्या असल्या तरी त्या मला आवराव्या लागणारच आहे. तुझ्या पासून दूर जाण खुप जड जातंय रे मला..काय सांगू तुला तुझ्या विना कशी होते माझी दशा….
“तू जर नसला तर मन व्याकुळ होऊन जातं, डोळे तुझ्याच शोधात असतात, तुला पाहून येणारी चेहेऱ्यावरची चमक नाहीशी होते, डोक्यात फक्त तुझाच विचार असतो, आणि हृदयात अश्रू धाराची नदी वाहत असते, कितीही विचार केला तरी तुझ्या पासून दूर जाण शक्य होत नाही कारण माझं मन याला अनुमती देत नाही”, तुझा तो गालावर मायेने फिरवलेला हाताचा स्पर्श नेहमी मला जाणवतो… आणि स्वार्थीपणा निर्माण करून जातो.. मी स्वार्थी झाले अस नेहमी वाटत असत पण मी फक्त तुझ्यावर प्रेम केलं आहे असा विचार केला तर यात मी कुठे स्वार्थी आहे असेही मला वाटू लागते…..
” आपलं प्रेम आपल्याला कधी आणि कोणत्या स्वरूपात मिळेल याची कोणालाच जाण नसते आणि ते मिळालं की आपल्या हृदयाच्या भावनांना आवार घालणं कठीण होऊन जात “

प्रेम

Leave a Comment