Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना प्राधान्य देण्यासाठी नव्या जुन्या योजनांचा मेळ घातला आहे. राज्यातील महिला आणि मुलींना सामाजिक, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व दर्जा प्राप्त होण्यासाठी पोषण आहार, स्वास्थ्य, शिक्षण, उद्याोजकता, तसेच कौशल्य विकास आणि रोजगारासाठी विविध योजनांची घोषणा करीत त्या प्रभावीपणे राबविण्याची ग्वाही पवार यांनी यावेळी दिली.स्त्री पुरुष समानता साध्य करणे आणि सर्व महिला आणि मुलींना सक्षम करणे हे शाश्वत विकास ध्येयांपैकी एक ध्येय आहे. महिलांसाठी विविध योजना सध्या लागू आहेत. त्यात आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची भर पडली आहे.
Table of Contents
Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नक्की काय आहे ?
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत २१ ते ६० वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. सुमारे एक कोटी महिलांना याचा लाभ होणार असून जुलैपासून या योजनेची अंमलबजाणी केली जाणार आहे. त्यासाठी सरकारवर वर्षाला ४६ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. १ जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत.
शेवट तारीख 15 जुलै 2024.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता पहा .
- महाराष्ट्र रहिवासी
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
- 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपत्र कोण असेल .
- 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
- घरात कोणी Tax भरत असेल तर
- कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
- कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
- कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
*लागणारी आवश्यक कागदपत्रे आजच काढून घ्या नंतर होणारी धावपळ वाचवा*.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?
- ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे अर्ज भरावा .
- शहरी भागातील सेतु कार्यालय मध्ये जाऊन अर्ज करावा .
१ जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली असून १५ जुलैपर्यंत अर्ज संकलित करण्यात येणार आहेत. सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य देत हे काम पूर्णत्वास न्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला जात आहे. वयाची २१ वर्षे पूर्ण झालेल्या व ६० वर्षे ज्यांची पूर्ण झाली नाहीत अशा वयोगटातील महिलांनी हे अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करावयाची आहेत.
दरमहा १५०० रुपये
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बैंक खात्यात दरमहा १५०० इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे१५०० पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.