फक्त तू एक पाऊल पुढे टाकून तर बघ
फक्त तू एक पाऊल पुढे टाकून तर बघ……….
वडिलांकडून अनुभवी मार्गदर्शन मिळेल,
तू सल्ला मागून तर बघ,
आईकडून कौतुकाची थाप मिळेल,
तू कर्तुत्व गाजवून तर बघ,
भावाकडून भक्कम आधार मिळेल,तू हाथ पुढे करून तर बघ,
बहिणीची वेडी माया मिळेल, तू साद घालून तर बघ,
बायकोचे नितांत प्रेम मिळेल,तू विश्वास ठेवून तर बघ,
मुलगी ही वंशाची पणती बनेल,तू वात पेटून तर बघ,
मुलगा ही म्हातारपणी ची काठी बनेल,तू पाठीशी उभा राहून तर बघ,
मित्रांकडून मोलाची साथ मिळेल,संकटाशी सामना करून तर बघ,
सगळ्यांची रूप वेगळी भावना मात्र प्रेमाची आहे,तू एकदा आजमावून तर बघ,
हे सगळ जगच तुला सुंदर दिसेल,तू फक्त दृष्टी बदलून तर बघ……

-
पोस्ट ऑफिसच्या योजनेतून दरमहा 20 हजार रुपये पेन्शन: सविस्तर माहिती
पोस्ट ऑफिस
-
पीक कर्जा साठी नाबार्डचा नवीन नियम: सविस्तर माहिती
पीक कर्ज
-
एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा: तयारी आणि संधी
एसएससी जीडी कॉन्स्टेबल म्हणजे काय? एसएससी (कर्मचारी निवड आयोग) जीडी (जनरल ड्युटी) SSC GD Constable कॉन्स्टेबल परीक्षा ही भारतातील केंद्रीय पोलीस दलांमध्ये (CAPFs) कॉन्स्टेबल पदांसाठी घेतली जाणारी अत्यंत महत्त्वाची परीक्षा … Read more