Humanity

मानुसकी

रात्री चे आठ वाजले होते. माधुरी आणि धनश्री ह्या घरच्या दिशेने येत होत्या. पावसाचे वातावरण होते. गार वार सुटला होता. रास्ता आता पूर्ण सामसुम झाला होता. रोड वर कोणी जास्त लोक नव्हते. ह्या घराच्या दिशेने येत होते. अचानक त्याना रस्त्यावर कोणी दिसले म्हणून ते मागे वळून त्या व्यक्ति जवळ गेल्या. अतिशय व्यस्कर आज्जी होत्या त्या. कमीत कमी त्या नव्वद च्या आसपास त्यांची वयोमर्यादा असेल. पूर्ण वाकुंन त्या चाल्या होत्या. त्या घाबरलेल्या अवस्था मध्ये होत्या. कारण आंधर होत चालला होता. रस्त्यावर कोणी नव्हते. ह्या दोघी त्या आजी पाशी गाड़ी थाबुन काही पैसे देत म्हणाल्या ..

” हे घ्या आजी काही खाउन घ्या”. त्या दोघी ना असे वाटले की ह्या कोणी भिकारी असेल. एवढ्या आंधार झाला आहे. तरी ह्या बाहेर पोटा साठी फिरत असेल. पण त्या आज्जी नी पैसे नको म्हणाली.

तेव्हा त्या दोघी एकमेकिंकड़े पाहत मनात विचार करत होते पैसे का नको म्हणत आहे ह्या? पुढे आज्जी म्हणाल्या मि माझे घर विसरले आहे. आणि मला आता ते सापडत नाही आहे. मि खुप वेळ ची चालते आहे. पण कुठे आहे घर माहित नाही. आजी कड़े फोन ही नव्हता की घरी फोन करुण सांगेन की मि रास्ता चुकले आहे.

त्या दोघी मूली नि आज्जी ना धीर देते म्हणाल्या बसा तुम्ही गाड़ी वर आम्ही तूम्हाला सोड़वतो तुमच्या घरी. आजी ला पण आता थोड़े बरे वाटले होते की कोणी तरी त्यांची मदत करीत आहे.

कारण रास्ता पूर्ण मोकला होता कोणी दिसत नव्हते. गार वारा पण सुटला होता. आज्जी नि त्या मुलींना विचारले की आता किती वाजले आहे?

तेव्हा त्या मुलींनी सांगितले की आता आठ वाजले आहे. तेव्हा आजी म्हणाल्या मि चार वाजता शेतपाऊल करण्या साठी बाहेर पडले पण आता मला घर नाही सापडत.

पूर्ण चार तास आज्जी ह्या त्यांच्या घरपासुन दूर होत्या. त्यांचे घरचे पण आता त्याना बघण्यास सुरु केले होते. कारण आजी ह्या शेतपाऊल करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या.

आज्जी आर्ध्या तासा मध्ये येईल घरी असे घरच्या ना वाटले पण आता पूर्ण चार तास होऊन गेले होते. आज्जी कड़े फ़ोन नसल्या ने संपर्क पण करू शकत नव्हते. इकडे माधुरी ने आज्जी न विचारले की तुमच्या कड़े तुमच्या पत्ता आहे का?

कुठे आहे नेमके, गांव, ठिकान, जवळपास काही ओळख त्या ठिकान ची? आज्जी ला काही च माहित नव्हते कारण आजी ह्या त्यांच्या बहिनी च्या मुलाकडे आल्या होत्या. त्याना इथले काही माहित नव्हते.

मग धनश्री ने विचारले की तुम्ही त्याच्या कड़े आले त्यांचे नाव काय आहे? तेव्हा आजी ने त्याना त्या वक्ती चे नाव आणि आडनाव सांगितले. त्या आज्जी ला पूर्ण नाव नव्हते माहित आणि त्या नावाचे खुप लोक होते. शोधन पण कठिन जाऊ लागले होते. त्या दोघी च्या मनात विचार येऊ लागले की आता के करायचे कुठे सोडायाचे यांना? घरी घेऊन जायचे का आपल्या?

पण यांचे वय पण जास्त आहे. काय करावे त्याना आता समजत नव्हते. कारण एक ते दिड तास हा घर शोधन्या मध्ये गेला होता. आता त्यांच्या घरचे पण त्याना फोन करत होते उशीर झाला म्हणून.

शेवटी त्यानी एक निर्णय घेतला . की आपण ह्या ना पोलिस स्टेशन ला घेऊन जाऊ आणि तिथे माहिती देउ मग घरी घेऊन जाऊ. जरी घरच्या नी पोलिस स्टेशन ह्या विषयी कम्पलेट दिली तर आपल्या कड़े आज्जी आहे हे पोलिस सागतील. पण हे तेथे गेल्या वर याना समजले की काही वेळा पूर्वी यांची हरवल्याची कम्पलेट त्यांच्या मुलीं ने दिली होती.

आणि त्या सोबत फ़ोटो देखील होता. तो आज्जी सोबत जुलत असल्या कारणाने पोलिस म्हणाले आता च यांचे घरचे येऊन गेले त्यांनी आजी हरवल्या आहे अशी कम्पलेट दिली आहे. आता आकरा वाजले होते.

आता पूर्ण सात ते आठ तास हे आज्जी ना घर सोडून झाले होते. ह्या दरम्यां न त्यांनी आज्जी ना जेवन दिले होते. आता त्यांची चांगली मैत्री झाली होती. काही वेळाने त्यांचे घरचे आले आणि आज्जी ना पाहुन खुप खुश झाले कारण ते पण गेल्या आठ तासा पासुन आज्जी चा शोध घेत होते. त्यानी माधुरी आणि धनश्री चे आभार मानले आणि आज्जी ना घेऊन गेले.मित्रांनो हि खरी आणि रियल स्टोरी आहे. त्या आज्जी ना ह्या मुलीं भेटल्या नसत्यात तर? काय झाले असते आज्जी चागल्या घरा मधल्या होत्या. कोणी चोरानी त्यांना फसवले असते तर. असे अनेक प्रश्न त्या आज्जी समोर पण त्या वेळी उभे राहिले असेल. ह्या मुलीं त्या आज्जी ना देवा सारख्या भेटल्या कदाचित देवाने च पाठवले असेल त्यांना……..

आपण आज काळ ह्या धावपळी च्या जगात आपण एकमेकांस विचार पूस करने ही सोडले आहे. हे चित्र जास्त करुण शहर भागा मध्ये जास्त प्रमाणात पाहण्यास मिळते. चोवीस तास हा घरच्या दरवाजा हा बंद असतो. शेजारी कोन राहते याची कल्पना ही आपल्याला माहित नसते. आपण व्हाट्सएप वर ज्या वक्ती ला good morning आणि good night चे मेसेज करतो. पण जेव्हा तो समोर येतो तेव्हा आपण त्या सोबत बोलत नाही. खुप दिवसांनी जरी मित्र किंवा नातेवाईक भेटले तरी आपले जास्त लक्ष फ़ोन मध्ये असते. आपण विचार पूस करत नाही कदाचित आपण आपल्या मधली मानुसकी विसरत चालो आहे. प्रेमाचे दोन शब्द ऐकून घेण्यासाठी तरी कोणी पाहिजे आपण त्या सोबत बोलू की मन आपले हलके होईल.

सतत डिप्रेशन येन्या मागचे कारण पण हे असेच आहे. आपण आपल्या मध्ये च असतो मन थोड़ हलके पण केले पाहिजे. माणसे एकमेकांन पासुन दूर तसे पण होतच होते तर ह्या कोरोना ने चांगले कारण देऊन गेला.

तुमची गरज असते तुमच्या कुटुंबा मधील इतराना तुमच्या वेळ पाहिजे असतो. त्यांना आणि तो जेव्हा च महत्वाचा आहे. जेव्हा त्याची गरज आहे.

ह्या स्ट्रोरी मध्ये त्या मुलीं कोरोना ची भिति न बाळगता त्या वक्ती पाशी गेल्या जो पर्यंत त्यांचे घरचे येत नाही तो पर्यन्त ते तिथून हल्ले नाही. आमचा सैल्यूट आहे माधुरी आणि धनश्री यांना.. आणि खुप साऱ्या शुभेच्छा तुमच्या या कार्यासाठी..

3 thoughts on “Humanity”

  1. धनश्री आणि माधुरी या दोन्ही माझ्या मुली आहेत त्यांना कोणी असे वृद्ध व्यक्ती दिसल्यावर त्या खूपच भावनाविवश होऊन त्यांना काय हवे ते मदत करण्यासाठी प्रयत्न करत असतात
    या केलेल्या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे मला माझ्या मुलींवरती खुप गर्व आहे..

    Reply
  2. Thanku so much😊😊 Kadhi konala road ver aaji aajoba disle trr nki madat kart jaa aplyla mahiti nast ki konla kay madat pahije 2 min thabun nki tyna Madat kart java🙏🙏

    Reply

Leave a Comment