H3N2 व्हायरस काय आहे, आणि त्याचे लक्षणे?।What is the H3N2 virus, and its symptoms?

मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून हे नाव तुम्ही ऐकत असेल. बरेच लोकांना हा प्रश्न पडला असेल की कोरोना चं काही प्रकार आहे का? तर मित्रांनो H3N2 व्हायरस हा करोना चा प्रकार नाही आहे हा तर वेगळा व्हायरस आहे. या मधले प्रमुख लक्षणे म्हणजे तुम्हाला मळमळ होते, किंव्हा उलटी सुध्दा होते. या त तुम्हाला खोकला घसा खवखवणे आणि अंग दुःखी अश्या वेदना होतात. आणि हीच प्रामुख्याने ने लक्षण H3N2 व्हायरस मध्ये आहे.

H3N2 व्हायरस कोणत्या वयोगटातील लोकांना साठी घातक आहे किंव्हा काळजी करण्या सारखा आहे?

कोणता H3N2 व्हायरस हा अश्या लोकांना घातक असतो ज्यांची प्रतिकार शक्ती ही कमी असते. मग ते ५ वर्ष खालील मुले असो किंवा ६५ वर्ष वरील वरिष्ठ नागरिक असो, याच्या साठी जास्त काळजी करण्या साठी आहे. या वयोगटातील लोकांनी आपली काळजी घेणे ही अति महत्वाचे आहे. तसेच गरोदर माता,उच्च रक्तदाब असणारे व्यक्ती, इतर आजार असणारे उदाहरण म्हणजे हृदयरोग, मधुमेह, फुप्फुस, यकृत, मूत्रपिंड याचे आजार असणारे यांनी सुध्दा आपली काळजी घेणे हे गरजेचे आहे.

H3N2 व्हायरस साठी काळजी कश्या प्रकारे घेऊ शकतो?

आपण बाहेरून आल्या वर तोंडं हातपाय धुणे हे गरजे चे आहे. त्याच बरोबर वारंवार आपले हाथ हे स्वच्छ धुतले पाहिजे. तसेच आपल्या आहारात आपण नेहमी पौष्टिक आहार घेतला पाहिजे. आणि दरोराज आपण जास्त पाणी पिणे गरजे चे आहे. व्हिटॅमिन सी असणारे पदार्थ जास्त खाल्ले पाहिजे उदाहरण लिंबू, मोसंबी,आवळा, आणि हिरव्या2 पालेभाज्या आपल्या आहारात समाविष्ट कराव्या. बाहेर गेल्यावर मास्क चा वापर करावा. खोकताना आणि शिंकताना आपले नाक योग्य प्रकारे झाका. अश्या पध्दतीने आपण H3N2 व्हायरस पासून काळजी घेऊ शकतो.

H3H2 व्हायरस हा आजार टाळण्यासाठी हे करू नका.

गर्दीच्या ठिकाणी जाणे होता होईल तेवढे टाळावे. हात मिळवणे किंव्हा स्पर्श करणे होता होईल तेवढ टाळावे. सार्वजनिक ठिकाणी थँकू नये. आपल्या नाका ला किंव्हा तोंडाला सारखा सारखा हात लावू नये. जास्त गर्दीत जाऊ नये. आणि डॉक्टर च्या सल्ल्या शिवाय कोणते ही औषधे घेऊ नये. H3N2 व्हायरस चे काही लक्षणे आढली तर डॉक्टर चा सल्ला घेवा.

Leave a Comment