चहा कराला साखर नव्हती. ना जेवण बनवायला काही भा जी पाला नव्हता. जे काही होते ते संपून गेले होते. बाहेर कोरोना चे संकट होते तर जगण्यासाठी लागणारे वस्तू घेण्या साठी पैसे ही नव्हते. झाले होते सरकार ने तांदूळ आणि गहू हे मोफत दिले त्या मुले थोडासा दिलासा आला. पण रोज भात तर खाऊ नाही शकत ना?
मोठया मोठया घरात आज काय नवीन करून खायचं हे ठरवत होते. आणि ते बनवून मोबाईल वर फोटो पोस्ट करत होते.
तर संतोष च्या घरी आज ची रात्र गेली उद्या चा दिवस कसा जाईल याची मात्र काळजी वाटत होती. श्रीमंत लोकां साठी ही मौज मस्ती करण्या साठी सुट्टी होती. तर गरीब लोकां साठी हि एक मोठी शिक्षा होती.
ती पण कोणता हि गुन्हा न करून. हे झाले संतोष चे पण असे अनेक कुटूंब आहे. जे हे आज सर्व सहन करत आहे. ह्या करोनाचे संकट, ह्या संकटाला मुके जनावरं पण मोकळे नाही किंवा याची पण सुटका झाली नाही. रोड वर मोकाट फिरणारी कुत्रे किंवा मोकळ्या सुटलेल्या गाया यांना हि सगळे सहन करावे लागले कारण जे ह्या जनावरांना जेवण देत होते, टाकत होते ते घरात बंद होते. कारण बाहेर पडू नका हा सरकार चा निर्णय होता. कारण हा आजार संसर्गजन्य होता एक वेक्ती कडून दुसऱ्या वक्ती ला सहज रित्या होत असल्याने हा निर्णय घेतला होता. त्या मुळे कोणी बाहेर पडत नव्हते.
संतोष कामा वर जाताना नेहमी घरून काही भाकर आणत असे आणि ती ह्या भटक्या जनावरां ना देत असे. पण आता सगळे च बंद होते तर त्यांना हि जेवण नव्हते भेटत.
संतोष आणि त्याची बायको आता काय करायचं काय नाही हे विचार करत होते. तेवढ्यात बाहेरून आवाज येतो. आणि संतोष …… संतोष
संतोष ने आवाज देत कोण आहे हे समजलं न्वहत कारण एवढ्या सकाळी कोण येईल आपल्या घरी असे तो विचार करत तो बाहेर आला.. आणि तो बाहेर येऊन बघतो तर काय त्याचे मालक होते बाहेर. ते त्याच्या साठी काही किराणा घेऊन आले होते. ते त्याला देतच असताना संतोष च्या डोळ्यात पाणी आले आणि तो म्हणाला “साहेब तुम्ही ह्या वेळास पगार पण दिला होता आणि आता किराणा पण देत आहे.” तेव्हा त्याचे मालक त्याला म्हणाले “तू गेली कित्येक वर्ष माझ्याकडे काम करतो. तुझ्या घरात जो पैसे घर खर्च करण्या साठी जो पॆसा येतो तो माझ्या कडून येतो. आज सगळं बंद आहे मग तुझ्या कडे पैसा कुटून येईल हे मला माहित आहे. तझे कुटूंब हे माझ्या वर अवलंबून आहे. ह्या वेळेस तर मी तुझ्या कडे पाठ फिरून कसे चालेन. ”
तेव्हा संतोष म्हणाला पण साहेब दुकान बंद तुमच्या कडे पैसे नसेल ना? कारण सगळे बंद आहे. तेव्हा साहेब म्हणाले पैसे तर माझ्या कडे पण नाही, बँकेचे हफ्ते आहे दुकानाचे भाडे पण आहे. पण हे सगळे असून मी तुझ्या कडे मी दुर्लक्ष नाही करू शकत. हा पैसा माझ्या मुलीच्या लग्नं साठी ठेवला होता तो आहे. संतोष म्हणाला आता साहेब तेव्हा त्याचा साहेब म्हणाला अरे आता काय.. पुन्हा कमवू आपण सगळे सोबत . त्यांनी संतोष ला काही पैसे आणि किराणा देऊन निघाले. आणि जात असताना म्हणाले काळजी घे आणि विनाकारण बाहेर नको पडू. तो हि म्हणाला तुम्ही पण काळजी घ्या.
त्याची बायको आणि आई पण खुश झाल्या कारण त्यांच्या कडे काही च किराणा नव्हता. त्याची आई आणि बायको हे एक मेका सोबत बोलत असतांना . त्याच्या मनात वेगळे चालू होते. ते म्हणजे…..
संतोष ला त्यांच्या साहेब नि सांगितलं कि तुम्ही माझ्या वर अवलंबून आहे मी तुमच्या कडे पाठ फिरवली तर कोण पाहील. तेव्हा त्याला आठवले की आपल्या वर कोणी तरी अवलंबून आहे, आणि तो त्याच्या बायकोला म्हणतो कि काही तरी भाकरी वैगरे मला बनवून दे. आणि त्याची बायको काही वेळाने त्याला बनवून पण देते आणि तो ते घेऊन कामाच्या दिशेने जातो. तो रोज ज्यांना भाकरी टाकतो त्या जनावरांना तो टाकण्या साठी जातो. कारण त्याला वाटते हे हि आपल्या वर अवलंबून आहे. त्याच्या मनाला छान वाटते.