पालकांचे नियंत्रण मुलांना मोबाईल वापरताना Parental control.

मित्रांनो मी या आधी च्या ब्लॉग मध्ये ही सांगितले होते. की मुलाच्या हाथा मध्ये मोबाईल देणे हे किती चुकीचे आहे आणि त्याने के के होते. पण सध्या सर्वत्र मुलांना मोबाईल वरून अभ्यास दिला जातो आहे.काळाची पावले व बदलणारे आधुनिक जग बघता शिक्षणात तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अनिवार्य झाले आहे. जे पालक मुलांना मोबाईल हाताळायला देण्यास टाळाटाळ करत होते आज मुलांच्या हातात मोबाईल देणे नाईलाजाने का होईना पण अत्यावश्यक झाले आहे अशीच सर्वत्र परिस्थिती आहे.मुलांना अभ्यासाला मोबाईल दिला तरी मुलं आपलं थोडंस दूर्लक्ष झालं तरी मोबाईल वर गेम खेळणे हे कृत्य करत असतात .या परिस्थितीत पालकांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवू शकतात.मुलांना गेम खेळतांना मध्ये मध्ये येणाऱ्या घाणेरड्या जाहिराती व नको त्या अॅप चे डाउनलोड करणे थांबवता येऊ शकते त्या साठी प्ले स्टोअर वर एक छोटीशी सेटिंग करावी लागते.
आपल्या मोबाईल मध्ये असलेले प्ले स्टोअर उघडा – डावीकडच्या वरच्या कोपऱ्यात असलेल्या तीन आडव्या रेषा आहेत त्यावर क्लिक करा- खाली आठव्या क्रमांकावर सेटिंग हा पर्याय क्लिक करा- parental controls हा पर्याय of दिसेल तो on असायला हवा. त्यासाठी त्यावर क्लिक-parental controls are off यापुढील स्क्रोल उजवीकडे सरकवा-create content pin अशी नवी विंडो उघडेल यात चार अंकी लक्षात राहील असा पीन टाका . Confirm pin म्हणून परत तोच पिन क्रमांक टाका ok-वरती बघा जिथे ऑफ होते तिथे ऑन झालेले दिसेल. आता खाली ऍप व गेम यावर क्लिक-rated 3+ ते allow all पर्यंत पर्याय आहेत .हे पर्याय म्हणजे आपल्या पाल्यांचा वयोगट. आपली मुलं ज्या वयोगटात मोडतात तिथं क्लिक करा. एका पेक्षा अधिक मुलं असतील तर मोठा ज्या वयोगटाचा तो वयोगट निवडा व खाली सेव्ह वर क्लिक करा.ही सेटिंग मुलांच्या
 नकळत करा त्यांना पिन कळता कामा नये.
आता येणारे प्रत्येक App व जाहिरात ही मुलांच्या वयोगटाला अनुसरून येणार…

Leave a Comment