Tujhi majhi love story in marathi

आपण वाचत आहत तुझी माझी लव्ह स्टोरी मराठी भाग 1

तुझी माझी लव्ह स्टोरी भाग १

तुझी माझी लव्ह स्टोरी
तुझी माझी लव्ह स्टोरी

आज मी अशी एक लव्हस्टोरी सांगणार आहे कि वाटलं होत ती कधी च पूर्ण होणार नाही. पण ती पूर्ण झाली, किती संकट आले पण ती पूर्ण झाली. हे कहाणी आहे अमित आणि मोनाली ची आज पासून ठीक दहा वर्ष म्हणजे मोनाली आणि अमित हे दहावी मध्ये होते. मोनाली चे वडील हे एक शिक्षक होते. म्हणून त्यांच्या नेहमी बदली होत असे. ह्याच दरम्यान ती बेलापूर ह्या गावात आले. अमित हा त्याच गावाचा होता. मोनाली हि नवीत असेल तेव्हा ती ह्या गावात आली होती, अमित आणि मोनाली हे शेजारी राह्यला होते. मोनाली चे वडील हे इंग्लिश शिकवत असे. तेव्हा मोनाली चे इंग्लिश पहिल्या पासून छान होते.

अमित आणि मोनाली ची चागंली मैत्री बनली होती. अमित ला चित्र काढायला खूप आवडत असे, आणि मोनाली ला त्याने चित्र काढलेले खूप आवडत असे.

ते शाळेत पण सोबत जायचे आणि यायचे. ती जेव्हा दहावीत गेले तेव्हा सोबतच अभ्यास करायला असत. ते नेहमी सोबत असायचे. मोनाली कधी गावाला गेली किंवा तो बाहेर गेला तर त्यांना तेव्हा करामत नसे. कधी येईल म्हणून त्यांच्या घरच्यांना येड्यात काडत असे. मोनाली ला नाचायला खूप आवडत असे. तेव्हा तिने दहावी ला असताना एक कार्यक्रमात लावणी सादर केली होती बाई माझी करंगळी मोडली ह्या गाण्यावर. त्याच वेळेस त्याने पण एक नाटक सादर केले होते. विशेष म्हणजे ते त्याने लिहले होते.

दोघांची पण दहावी ची परीक्षा झाली आणि दोघे पण गावाला जाणार होते मामा च्या. पण अमित जास्त दिवस नाही थांबला तो लगेच आला कारण त्याला मोनाली शिवाय करामत नव्हते. पण मोनाली आजून आली नव्हती. तिने तिचे पुढील शिक्षण हे मामा कडे पूर्ण करणार होती. हे त्याला रिस्ल्ट लागल्यावर समजले होते. त्याला खूप दुःख वाटले होते. तू तिला म्हणाला ” इथे पण खूप चांगले कॉलेज आहे तू का जाती”. पण मोनाली च्या घरच्या ची इच्छा होती. आणि तिच्या समोर काही पर्याय नव्हता. तिच्या वडिलांनी तिचा दाखला काढला आणि ते दुसऱ्या दिवशी निघून गेले. तिच्या कडे त्याचा नंबर नव्हतं आणि तिच्या कडे त्याचा. अमित ने त्याची बारावी पूर्ण केली आणि तो डॉकटर च शिक्षण घेण्या करीत तो शहरात गेला. तो मनोमन तिला खूप मिस करत होता. आता दोन वर्ष पूर्ण झाले होते. ती फक्त दिवाळी ला एकदा घरी आली होती तेव्हा अमित पण बाहेर होता. इकडे मोनाली पण शिक्षक बनण्या साठी शिक्षण घेत होती तिला शिक्षक बनायचं होत.

आता तिच्या वडिलांची पण बदली दुसऱ्या गावी झाली होती. आता त्याला तिच्या पर्यंत कसे पोचावे तेच काळात नव्हते. तिला हि त्याला भेटायचं होत. ते दोघे पण एकमेकांन वर प्रेम करत होते. पण हे त्या दोघांना पण उमजत नव्हते. पण एक दिवस असा आला जेव्हा त्यांची एक मैत्रीण होती दहावी ची तीच लग्न होत आणि हे आमंत्रण तिला पण आणि त्याला पण गेले होते.

आपण वाचत आहत तुझी माझी लव्ह स्टोरी मराठी भाग 1

हा सुट्टी साठी घरी आला होता तेव्हा मे महिना चालू होता. जेव्हा हे त्याला समजलं तर हा गेला. त्याला वाटलं कदाचित ती पण येईल, पण त्याला सर्व भेटले पण ती दिसली नाही. मग याला राव्हल नाही आणि याने त्यांच्या तल्या मैत्रीण ला विचारलं मोनाली पण आली का…? आणि ती म्हणाली हा केव्हाच आली आहे नवरी च्या रम मध्ये आहे. आणि विशेष म्हणजे ती मैत्रीण पण बोलते ती तुला विचारत होती आला आहे का? मोनाली ने पण तिलाच विचारलं होत कि अमित आला आहे का..? अमित लगेच नवरी च्या रूम मध्ये जातो आणि तिला शोधतो. पण आत मधले काही लोक सगळया पाहुण्या लोकांना बाहेर काडत होते कारण नवरी चा मेकअप चालू असतो. तो पुन्हा दरवाज्या पाशी येतो. तो मनातल्या मनात म्हणत असतो देवा मला आज तरी तिला भेटू दे पिल्ज

तुझी माझी लव्ह स्टोरी …अमित आणि मोनाली ची कहाणी आजून पुढे आहे ……

तुझी माझी स्टोरी भाग 2

2 thoughts on “Tujhi majhi love story in marathi”

Leave a Comment