Kutumb (Family) कुटुंब

Family (Kutumb)कुटुंब (Family)

जर एक कुटुंब (Family) चांगले असेल तर त्यात सगळ्यात मोठा वाटा जो असतो, तर तो एका बाई माणसाचा कारण तीच ते कुटुंब (Family)चांगले बनू शकते. किंवा तीच ते कुटूंब तोडू शकते. कारण घरातल्या माणसाला जोडून ठेवायचं काम हि घरातली महिला करते.

ती भांडणे वाढू शकते किंवा ते थांबू पण शकते. आता यात सगळ्या च महिला तशा वागत नाही काही चांगल्या पण असता. त्या घरा साठी नेहमी चांगला विचार करता आणि त्या साठी तसे पण वागतात. जेव्हा मुलीचे लग्न होते आणि ती नवीन घरात जाते तीच एक नवीन

कुटुंब (Family) असते. त्यात तिचे सासू सासरे दिर आणि नणंद असे कुटुंब (Family) असते.

जेव्हा ती घरात जाते तेव्हा च मनात ठरवलं कि हि माझी सासू नाही तर आई आहे. आणि हे माझे सासरे नाही तर वडील आहे. तर तिला तिथे राहणे स्वप्पे जाईल. या उलट तिने यांना सासू सासरे च समजले तर तिला ते परके वाटण आणि ती त्याच्या पासून दूर होण्याचा पर्यन्त देखील करेल.

हे थोडं सोप्प भाष्यात सांगण्याचा पर्यन्त करतो एका उदाहरण द्वारे एका कंपनी होती त्या मध्ये दोन मजूर काम करत होते. आणि एक नवीन तिथे काम करण्या साठी आला. त्या जुन्या मजूर पैकी एक त्या नवीन मजूर ला म्हणाला कि हा चांगला नाही चोरी करतो. आता हे खर नव्हतं कारण त्या दोघांचे पटत नव्हते.

पण हे ऐकल्या मूळे जो नवीन आला त्याचा त्या वक्ती कडे बघण्याचा द्रुष्टीकोन पूर्ण पणे बदला. तो त्याला चोर ह्या नजरतेत पाहू लागला. आणि त्या पासून आपल्या वस्तू लपून लपून ठेवू लागला. आता खर तर त्याने त्याला कधी चोरी करताना पहिले नाही. पण याच्या सांगण्या वरून तो तसे करू लागला. तो तर चांगला होता आणि इमानदार होता.

पण दुसऱ्या मजदूर नि त्याच्या बद्दल वाईट सांगून त्याला वाईट बनवले. आणि एक दिवस त्याला हे कळाले कि चांगले कोण आणि वाईट कोण तेव्हा त्या मध्ये चांगल्या प्रकारे मैत्री झाली. आता हीच मैत्री आधी पण झाली असती जर त्याने याच्या बद्दल चांगले सांगितले असते तर.

असेच आहे आपण ज्या घरात जातो तेव्हा आपण मनातच तो द्रुष्टीकोन ठेवतो आणि तसेच वागतो. म्हणून खूप ठिकाणी तुम्ही पहिले असेल कि लग्न झाल्या वर एक दोन वर्षातच मुले हे आपल्या आई वडील पासून दूर होतात.

जेव्हा त्यांना तुमची गरज असते. तेव्हा तुम्ही त्याच्या पासून दूर जातात. त्या आई वडिलांना तुमच्या मुलानं सोबत खेळायचं असत. त्याच्या सोबत जगायचं असत तेव्हा ते तुमच्या पासून दूर होतात. मी इथे पूर्ण पणे मुलींना जवाबदार मानत नाही.

कधी कधी सासू सासरे पण त्या सुनेला सुने सारखे च वागणूक देतात. आणि म्हणतात सून हि कधी मुलगी होऊ शकत नाही. तेव्हा तुम्ही इथे पूर्ण पाने चुकतात. तिला एकदा चान्स दिला पाहिजे. मी मुलीच्या आई वडील ना पण सांगतो कि आपल्या मुली ला आधी पासून च सागा आम्ही जसे तसे ते आहे.

आम्ही म्हणून त्याचा सांभाळ कर. नाही तर तुम्ही सांगितले लवकर उठून स्वयंपाक कर, लवकर उटण्याची सवय ठेव,घरातले काम करत जा नाही तर तुझी सासू हे कारेन ते करेन इथेच तिला तुम्ही तिच्या सासू विषयी नेगेटिव्ह करतात. आता तुम्ही तुमचं काम करता कि अशा वागण्या मुले आपल्या मुली ला त्रास होऊ शकतो म्हणून तुम्ही कदाचित तिला सावध पण करत असेल.

पण दुसरी कोणती पद्धत वापरून सांगा म्हणजे ती तिचे मनमोकळे नांदू शकते.

तिच्या मनात सासू समजण्या आधी द्वेष निर्माण नका करू की सासू ही वाईट असते ती त्रास च देते… असे काही.
आणि सासू सासरे नि पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ती मुलगी आपले सर्व घर आई वडील आणि भाऊ हे सगळे नाते सोडून आली असते. नवीन नाते निर्माण करायला. तेव्हा तिला तुम्ही मदत करा तिला समजून घ्या.
प्रत्येक सासू ही कधी तरी सून असते हे विसरू नका.
जेव्हा जेव्हा तुम्ही असे वागण तेव्हा तुम्हाला च त्याचा त्रास होईल. नात्या मध्ये दुरावा निर्माण होईल. आणि हे नाते तुटू लागेन.
हे सर्व काही आपल्या हाथ मध्ये आहे, आणि आपण च सर्व ठीक करू शकतो.
आणि हो कधी पण घरातल्या भांडणात तिसऱ्या ला येऊन देऊ नका. ज्या मुले जे जोडयाचे असेल ते नाते पण तुटले जाते.
जर पूर्ण परिवार
कुटुंब (Family) सोबत असेल, तर किती ही मोठे संकट आले तरी त्याला सामोरं जायची तयारी ठेवते. तुम्हाला हे तर माहीत असेल ना एक काठी आपण हाथानी तोडू शकतो. पण अश्या पाच ते सहा किंवा त्या पेक्षा आधीक काठी आपण हाथानी सहज रित्या नाही तोडू शकत.
आपली परिवार आपले

कुटुंब (Family) हे आपल्या सोबत असले तर आपली प्रगती होणे साजिक आहे……

Leave a Comment